Install social plugin that has it's own SHORTCODE and add it to Theme Options - Socials - 'Login via Social network' field. We recommend: Wordpress Social Login
“शहरी गरिबांना सशक्त बनवून त्यांना सन्मानपूर्वक उपजीविका आणि सामाजिक समावेश मिळवून देणे, जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावेल आणि स्वाभिमानपूर्वक जीवन जगता येईल.”
उद्दिष्टे (Mission):
शहरी गरीब आणि दुर्बल घटकांना स्वयंरोजगार व कौशल्य विकासाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
महिला बचत गट (SHG), संघटनांमार्फत सामूहिक शक्ती निर्माण करून सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणे.
शहरातील फुटपाथ विक्रेत्यांना हक्क व संरक्षण देत त्यांना ओळखपत्र, प्रशिक्षण, आणि पतसुविधा उपलब्ध करून देणे.
कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मेळावे आयोजित करून युवक-युवतींना रोजगाराची संधी निर्माण करणे.
दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
शाश्वत उपजीविका निर्मितीसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराभिमुख उपक्रम हाती घेणे व नवउद्यमींना पाठबळ देणे.